बीड, दि. 1 :- बीड तालुक्यातील येळंबघाट येथील स्वातंत्र्यसैनिक
प्रल्हाद निळकंठराव कदम यांनी जम्मु काश्मिर मधील उरी येथे दि.18 सप्टेंबर 2016 रोजी
पहाटे सैनिक छावणीवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या
18 शुरविर सैनिकामध्ये महाराष्ट्राच्या 4 शुरविरांच्या बलीदानास अभिवादन करुन अशा शुरविरांच्या
कल्याणासाठी त्यांना मिळणारे स्वातंत्र्य सैनिकाचे एक महिन्याचे 21 हजार 900 रुपये
ध्वजदिन निधीमध्ये दान म्हणून जमा केले. त्यांनी ही मदत केल्याबद्दल जिल्हाधिकारी नवलकिशोर
राम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
शहिदांच्या प्रती
आपली गहन संवेदना प्रकट करुन सर्व नागरिकांना या वअशा बलीदान देणाऱ्या सैनिकांच्या
कुटुंबाच्या कल्याणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये ध्वजदिन निधीसाठी सढळ
हाताने मदत करावी असे आवाहनही स्वातंत्र्य
सैनिक कदम यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा