बीड, दि. 1 :- राज्याच्या
ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री
तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
सोमवार दि.3 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी
10.30 वाजता जळकोट येथून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी येथे आगमन व राखीव. सकाळी
11 वाजता परळी औष्णिक विद्युत केंद्राची पाहणी व औष्णिक विद्युत संच सुरु करण्याचा
कार्यक्रम. दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता संगम ता.परळीकडे शासकीय
वाहनाने प्रयाण व संगम येथील 33 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन व इंजेगाव व गोवर्धन येथील
33 केव्ही उपकेंद्र उदघाटनाची घोषणा. दुपारी 2 वाजता परळी जि.बीड हेलिकॉप्टरने बीडकडे
प्रयाण. दुपारी 3 वाजता मांजरसुंभा ता.जि.बीड येथे आगमन व 220 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन.
दुपारी 4 वाजता मांजरसुंभा येथून शासकीय वाहनाने बीडकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता
बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.45 वाजता बीडहून हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण
करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा