बीड, दि. 1 :- अल्पसंख्याक
बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग
शाळामध्ये पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत चालु वर्षासाठी प्रस्ताव
दाखल केलेल्या सर्व संस्थांनी त्यांच्या शाळेचे डायस कोड व लायसन्स तसेच पूर्वी उचललेल्या
अनुदानाचे वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्र बुधवार दि.5 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्हाधिकारी
कार्यालयातील संबंधित विभागात सादर करावेत अन्यथा प्रस्ताव अपात्र ठरतील. असे जिल्हाधिकारी,
बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा