शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

6 ते 15 ऑक्टोबर कालावधीत खेळाडूसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन



बीड, दि. 1 :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे मार्फत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात दि.6 ते 15 ऑक्टोबर 2016 या कालावधीत क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरामध्ये 12 ते 25 वर्ष वयोगटातील शालेय, महाविद्यालयीन मुले व मुलींना प्रवेश देण्यात येणार असून तज्ञ क्रीडा मार्गदर्शकाद्वारे सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 3.30 ते 5.30 या दोन सत्रात तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळांनी शिबीराचा लाभ घ्यावा. विशेषत: शालेय क्रीडा स्पर्धा सन 2016-17 मध्ये राज्य स्तरावर खेळण्याकरीता जाणाऱ्या खेळाडूंनी शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा. प्रशिक्षण शिबीराकरीता खेळाडू मर्यादा 100 एवढी असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शकाकडे करावीत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा