सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

गणेशोत्सवाच्या माध्यमातून बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती




            बीड, दि 12:- बीड जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व माजलगाव तालुक्यातील त्रिमुर्ती गणेश मंडळ चिंचगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्रिमुर्ती गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यासाठी स्टेजवर बालमजूरी प्रथेविरोधी संदेश देणारे ''मुलांनी जावे शाळेला, मोठ्यांनी जावे कामाला'', "माझ्या हाती लेखनी द्या हातोडी नको " आणि "या नयनातील स्वप्न ज्योती भविष्य त्यांचे तुमच्याहाती" अशा आशयाचे पोस्टर लावून परिसरातील जनतेला संदेश देण्यात आला. यावेळी प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी शेख अफसर व त्रिमुर्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी परिसरातील बालमजूर मुलांच्या पालकांशी संवाद साधला. असे बीड राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा