बीड, दि 12:- सन 2016-17 या वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत
अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांकडून दि.26 सप्टेंबर 2016 पर्यंत विविध बाबींचा लाभ
देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनामध्ये लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानातून
नवीन विहिर, सुधारीत कृषी अवजारे, विद्युत पंप, पाईप लाईन व इतर अनुषंगिक बाबींचा लाभ
देण्यात येत आहे. दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना शेतीसाठी
अर्थ सहाय्य देवून त्यांची आर्थिक उन्नती घडविणे व त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणने
हे या योजनेचे उदिष्ट आहे.
लाभार्थी निवडीचे निकष- ज्या शेतकऱ्यांजवळ
त्यांच्या स्वत:च्या नावे 6.00 हेक्टर किंवा त्या पेक्षा कमी शेतजमीन धारणेचा 7/12
व 8 अ दाखला. लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकरी असला पाहिजे, त्याचे दारिद्रय
रेषेखालील यादीमध्ये नाव असले पाहिजे, दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या
मर्यादेची अट राहणार नाही मात्र दारिद्र रेषेखालील शेतकऱ्याशिवाय अन्य अनुसूचित जाती,
नवबौध्द शेतकऱ्यांची जमीन धारणा 6 हेक्टर पेक्षा कमी आहे आणि त्यांचे सर्व मार्गाने
मिळणारे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपये आहे. अशा शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडून
उत्पन्नाचा दाखला बंधनकारक राहिल. लाभधारकाने या योजनेत यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह दि.26 सप्टेंबर 2016 पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी (विघयो) यांच्याशी संपर्क साधावा. असे
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा