बीड, दि 12:- माहे ऑक्टोबर 2016 या महिन्यासाठीचे अत्योंदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेंतर्गत गहू, तांदुळ
धान्य दुकानामार्फत जिल्ह्यातील पात्र कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी नियतन मंजूर
झाले आहे. हे नियतन एकूण 22 गोदामामार्फत स्वस्त धान्य
दुकानांना वितरित करण्यात येणार आहे.
वखार महामंडळ, परळी वैजनाथ येथून एनएफएसए
प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत गहु 1223 मे.टन व तांदुळ 1482 मे.टन तसेच पीपीपी परळी
वैजनाथ केसोना येथून एनएफएसए प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत गहु 2500 मे.टन व तांदुळ
1000 मे.टन, अत्योंदय योजनेअंतर्गत गहु 681.240 मे.टन व तांदुळ 454.110 मे.टनाचा पुरवठा
होणार आहे. अन्न महामंडळ नागापूर पीईजी येथून एनएफएसए प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत
गहु 698 मे.टन व तांदुळ 399 मे.टनाचा पुरवठा होणार आहे. अन्न महामंडळ अहमदनगर/नागापूर
येथून एनएफएसए प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत गहु 500 मे.टन व तांदुळ 400 मे.टनाचा
पुरवठा होणार आहे. अन्न्ा महामंडळ नागापुर पीईजी येथून अत्योंदय योजनेअंतर्गत गहु
199.020 मे.टन व तांदुळ 132.780 मे.टनाचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी,
बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा