बीड, दि.21
:- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड
मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे ऑक्टोबर 2016 साठी 8 हजार 18 क्विंटल
साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून हरी किशन ॲन्ड कंपनी
हैद्राबाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हरी किशन
ॲन्ड कंपनी हैद्राबाद यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय
धान्य गोदामात साखर पुरवठा करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2016 साठी 8 हजार 18 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन
जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाण मंजूर करण्यात येत आहे. बीड 1 हजार
542, गेवराई 1 हजार 260, माजलगाव 396, वडवणी(चिंचवण) 324, धारुर 483, अंबाजोगाई
581, केज 981, परळी वैजनाथ 809, पाटोदा 440, आष्टी 703, शिरुर कासार 499 क्विंटल याप्रमाणे
तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे
जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा