शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाबाबत गेवराई-वडगाव ढोकच्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा : आंदोलन मागे

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाबाबत
गेवराई-वडगाव ढोकच्या शेतकऱ्यांशी
जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा : आंदोलन मागे
          बीड, दि. 6 :- राष्ट्रीय महामार्ग क्र.211 चौपदरीकरणाच्या कामासाठी संपादित करण्यात येत असलेल्या गेवराई ग्रामीण, वडगाव ढोक ता. गेवराई मधील संपादित होत असलेल्या जमीनीसंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासमवेत गेवराईचे आमदार श्री. लक्ष्मण पवार  व संबंधित शेतकऱ्यांनी समस्येबाबत आज सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांनी भूमी संपादन पुर्नवसन व पुर्नस्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क भूसंपादन कायदा-2013 आणि राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1965 (1956 चा कायदा-48) या कायद्याबाबत माहिती देण्यात आली. सर्व संबंधित शेतकरी यांनी उचित सहकार्याच्या भूमीकेत आहोत व आंदोलन मागे घेत असल्याबाबत सांगितले. जिल्हा प्रशासनाने मावेजाबाबत आक्षेप असल्यास लवादाकडे दाद मागता येईल असेही जिल्हाधिकारी राम यांनी त्यांना सांगितले.
          जिल्ह्यामधील भूसंपादनाची प्रक्रिया करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी जिल्हा प्रशासनाची भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट करुन माहे ऑगस्ट 2016 अखेरपर्यंत शिल्लक असलेल्या लोकांचा मावेजा वाटप व आक्षेप निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा