गुरुवार, १३ जून, २०१९


जिल्ह्यात 37 (1) (3) कलम जारी
            बीड, दि. 13 –बीड जिल्हयात पाणी प्रश्न, चारा छावण्या संदर्भात विविध आंदोलने,रस्ता रोको तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होणार असून  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रविद्र परळीकर, अपर जिल्हा दंडधिकारी, बीड यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. 11 जून,2019 रोजीच्या रात्रीपासून 25 जून, 2019 पर्यंत लागू राहील. विशेषरित्या परवानगी घेतलेल्या मिरवणूकीस लागू राहणार नाही. या काळात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील असे कोणतेही शस्त्र, वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली असल्याचे अपर जिल्हा दंडधिकारी, बीड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                  *****
वृत्त क्रमांक:- 251
                                          प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित
                                             फळ पीक विमा  भरण्याचा अंतीम दिनांक 15 जुलै 2019
     बीड,दि,13:-जिमाका शासन निर्णय क्र.फवियो/2019/प्रक्र.25/10 अे दिनांक 22 मे 2019 अन्वये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत राज्यात पुर्नरचित हवामानाव आधारित फळपीक विमा योजना मृग बहार 2019-20 अतंर्गत बजाज अलायन्झ जनरल इन्शुरंन्स कंपनी मार्फत बीड जिल्हयात मोसंबी, डाळींब,सत्रा,लिंबु आणि चिकु या फळपिकाकरीता राबविण्यात येणार आहे संत्रा व लिंबु या फहपिकांचा विमा हप्ता उतरविण्याचा अंतीम दि. 14 जून 2019,मोसंबी व चिकु या फळपिकाकरिता 1 जुलै 2019 तर डाळींब या फळपिकाकरिता 15 जुलै 2019 पर्यत भरवयाचा आहे.
            नैसर्गिक अपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपीकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही योजना बजाज अलायन्झ जनरल इंन्सुरंन्स कंपनी मार्फत बीड जिल्हयातील मोसंबी,डाळीबं,सत्रा,लिंबू आणि चिकु या फळपीकांकरीता राबविण्यात येणार आहे. पुर्नरचित हवामान अधारित फळपीक विमा योजना कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिंकासाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक राहील. या योजनेत विमा हप्ता दर वास्वदर्शी दराने आकारला जाणार असून विमा हप्ता रक्कम फळपीक निहाय प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
विमा संरक्षित रक्कम, रुपये प्रति हेक्टर
शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये,प्रति हेक्टर
विमा उतरविण्याचा अंतिम दिनांक
संत्रा
77,000
3,8,50
14 जुन 2019
लिंबु
66,000
3300
14 जुन 2019
चिकू
55,000
2750
1 जुलै 2019
मोसंबी
77,000
3850
1 जुलै 2019
डाळींब
1,21000
6050
15 जुलै 2019

फळपिकांसाठी समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी पुढीलप्रमाणे आहे.
फळपिकाचे नांव
समाविष्ट हवामानाचे धोके
विमा सरक्षणाचा कालावधी
संत्रा
कमी पाऊस,
15जुन 2019 ते 15 जुलै 2019
पावसाचा खंड
16 जुलै 2019 ते 15 ऑगस्ट 2019
लिंबु
कमी पाऊस
15 जुन 2019 ते 15 जुलै 2019
पावसाचा खंड
16 जुलै 2019 ते 15 ऑगस्ट 2019
मोसंबी
कमी पाऊस
16 जुलै 2019 ते 31 जुलै 2019
पावसाचा खंड
1 ऑगस्ट  2019 ते 31 ऑगस्ट 2019
चिकू
जादा अद्रता व जास्त पाऊस
1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019
पावसाचा खंड

डाळिंब
पावसाचा खंड
16 ऑगस्ट   2019 ते 15 आक्टोबर 2019
जास्त पाऊस
16 आक्टोबर 2019 ते 31 डीसेंबर 2019

     विम्याच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनी कार्यालय,तालुकास्तरावरील प्रतिनिधी,तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि क्षेत्रीय कर्मचा-यांशी संपर्क साधावा. विमा भरण्यासाठी शेतक-यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता जास्तीत जास्त शेतक-यांनी पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                                               *******
वृत्त क्रमांक:- 252

                                                                       महाडिबीटी पोर्टलवरील पात्र विद्यार्थ्यानां
                                      शिष्यवृतीसाठी आवेदनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक 30 जुन 2019


       बीड,दि,13:- जिमाका, महाडिबीटीवरील अनु.जाती विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यानी सन 2018-19 या कालावधीतील शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजनेतंर्गत आवेदन भरण्यासाठी  मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम दिनांक 30 जुन 2019  पर्यंत आवेदनपत्र भरावेत.
          ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप भारत सरकार शिष्यवृत्ती/ शिक्षण फी योजनेचे आवेदनपत्र भरले नाही त्यांनी महाडिबीटी पोर्टलवर तात्काळ आवेदनपत्र भरावेत. महाविद्यालयानीं तपासणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बीड या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावे, यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

























वृत्त क्रमांक:- 253


पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा
बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

          बीड दि.13:- ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे  बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
              गुरुवार दि. 13 जून 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता परळी येथे आगमन व राखीव. 3.30 वाजता गाडे पिंपळगाव ता. परळीकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता नेटवर्क 18 यांच्या वतीने स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 18.00 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण,आगमन व मुक्काम.
                   शुक्रवार दि. 14 जून 2019 रोजी सकाळी 9.45 वाजता  वाहनाने पांगरी ता. परळीकडेप्रयाण. 10.00 वाजता आगमन व एक शेतकरी एक डीपी योजनेच्या कामाचा शुभारंभ. 11.40 वाहनाने घाटनांदूर ता. अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता आगमन व एक शेतकरी एक डीपी योजनेच्या कामाचा शुभारंभ. दुपारी 13.30 वाजता वाहनाने यशश्री निवासस्थान परळी जि. बीड येथे आगमन व मुक्काम.
          शनिवार दि. 15 जुन 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता वाहनाने पोहनेर ता. परळी जि. बीडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता सांसद आदर्श ग्राम योजनेतील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेचे लोकार्पण.दुपारी 13.00 वाजता वाहनाने नांदेडकडे प्रयाण. 
                                                             *****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा