सोमवार, २४ जून, २०१९


होमगार्ड भरतीसाठी 25 जून 2019 रोजी
च-हाटा रोडवरील वाहतुक पूर्णत:हा बंद राहील

        बीड,दि,24:- (जिमाका) बीड जिल्हयात दि. 24 जून व 25 जून 2019 रोजी होमगार्ड नांव नोंदणी कार्यक्रम आयोजित केला असून नाव नोंदणी कार्याक्रमासाठी जिल्हयातुन 4 ते 5 हजार उमेदवार येण्याची शक्यता आहे.
        उपस्थित उमेदवारांची धावण्याची चाचणी पोलीस भरतीप्रमाणे च-हाटा रोडवर घेण्यात येणार असून  त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकास घडू नये यासाठी दि. 25 जून 2019 रोजी सकाळी 6.00 ते सांयकाळी 18.30 वाजेपर्यंत च-हाटा रोडवरील वाहतुक पुर्णत:हा बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी  यांच्याकडून प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*-*
वृत्त क्र. 271
गौण खनिज वाळू वाहतुकीसाठी
गेवराई तालुक्यातील पुढील गावात 144 कलम लागू
       बीड,दि,24:- (जिमाका) गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याने गोदावरी पात्रात अधिकृत टेंडर देण्यात आलेले नाही. अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने गेवराई तालुक्यातील पुढीलप्रमाणे गावात 144 कलम लागू करण्यात आले आहे.
                 आगरनांदूर, संगम जळगाव, हिंगणगाव, रेवकी देवकी, पांगुळगाव, कटचिंचोली, भोगलगाव, राहेरी, गंगावाडी, रजापूर, बोरगाव बु., गुंतेगाव, पाथरवाला बु. गुळज, सुरळेगाव, मालेगाव बु, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव, खामगाव या गावातील गोदावरी पात्रातुन वाहनाने वाळू चोरी जाऊ नये तसेच वाळु चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरील गावातील गोदावरी नदी पात्रात वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्यवरील महसूल अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*-*-*-*-*-*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा