गुरुवार, ३ जानेवारी, २०१९




  स्त्री शिक्षणाची क्रांतीकारक चळवळ उभी करण्यात
सावित्रीबाई फुलेंचे अमुल्य योगदान
                 --अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे
       बीड, दि,3 :- अंधकाराच्या गर्देतुन प्रकाशाकडे जायचे असेल तर त्यासाठी शिक्षण हा बहुमुल्य ठेवा असून शिक्षणाची क्रांतीकारक चळवळ उभी करण्यात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी अमुल्य योगदान दिले. या महापुरुषांनी स्त्री शिक्षणाचा पाया आपल्या घरापासूनच सुरु केला. इतिहासाची पाने चाळतांना आपल्याला विविध राष्ट्रपुरुषाचा त्याग दिसून येतो. त्यांनी घालून दिलेल्या तत्वावर  आपण चाललो तर सामाजिक कार्यात आपलाही मोलाचा सहभाग लाभेल असे प्रतिपादन अपर  जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  केले.
          या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश माडीक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
             आधुनिक युगात महिलांचा सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात सहभाग असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला बरोबरीने काम करत आहेत. पूर्वीही तिचा शेतीमध्ये पन्नास टक्के वाटा होता त्यामुळे  कुटुंबातील पुरुषाने स्त्रीला सन्मानाने वागविले पाहिजे तरच आपण महापुरुषांच्या विचारांची सामाजिक मुल्ये रुजविल्याचे समाधान आपणास मिळेल. महापुरुषांची जयंती साजरी करण्यामागे शासनाचा हाच उद्देश आहे की, महापुरुषांच्या विचारांची उजळणी व्हावी व ते विचार समाजात रुजवावे असेही श्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
           या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील व इत्तर विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
                                                                    ********



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा