बुधवार, २ जानेवारी, २०१९


शासकीय योजनांबाबत
"लोकसंवाद"मधून जनतेच्या भावना
जाणण्याचा शासनाचा प्रयत्न
                                  -- जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
     बीड, दि,02:- शासन जनतेसाठी राबवत असलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी पारदर्शक कामकाजाचा "लोकसंवाद" मधून अनुभव आला आहे.
             जिल्हयातील कोणत्याही शासकीय कामकाजासाठी वरीष्ठ अधिकारी सदैव उपलब्ध असून नागरिकांनी आपले प्रश्न त्यांच्यापुढे मांडावेत. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शकपणे कामकाजासाठी प्रशासनातील अधिकारी प्रयत्नशील आहेत. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आज केले. "लोकसंवाद"कार्यक्रमा प्रसंगी ते लाभार्थ्यांशी बोलत होते.
             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्हयातील लाभार्थ्यांशी थेट ऑनलाईनसंवाद साधला. याप्रसंगी जिल्हयातील बारा लाभार्थी, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.
             प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी घरकुल योजना आदी गरीब व दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी लोक संवाद कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चेची संधी विविध जिल्हयातील जनतेला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रातून व्हिडीओ कॉन्फरन्स प्रसंगी जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी उपस्थित होते. त्यांना हा "लोकसंवाद" प्रत्येक्ष पाहता आला.
                                                                             ********
वृत्त क्रमांक:- 04
जिल्हाधिका-यांनी घेतला
महाडिबीटी योजनेचा आढावा

               बीड,दि,2:- महाडीबीटी शिष्यवृत्तीबाबत ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात येणा-या अडचणीबाबत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. 
             बीड जिल्हयातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणा-या शिष्यवृत्ती संदर्भात सर्व संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य,संचालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बँकेसंदर्भातील अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या त्यावर सविस्तर चर्चा करुन  जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे राहीले आहेत त्यांचे अर्ज भरुन घेण्याच्या सूचना संबधितांना केल्या.
                                                                          *******

वृत्त क्रमांक:- 05
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे
स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव
मधूकर कांबळे यांचा बीड जिल्हा दौरा
     बीड,दि,2:- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधूकर कांबळे यांचा बीड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
      गुरुवार दि. 3 जानेवारी 2019 रोजी सोईनुसार परभणी येथून शासकीय वाहनाने परळीमार्गे बीडकडे प्रयाण व मुक्काम.                         ******













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा