शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९


   प्रासंगिक लेख

                                 शिवरांयाच्या मनात  स्वराज्य स्थापनेच                
                                    बीज पेरणा-या राजमाता जिजाऊ

                 बुलढाणा जिल्हयातील सिंदखडराजा येथे आई म्हाळसा व वडील लखोजीराव जाधव या राजघराण्यात जीजाबाईचां जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. राजघराण्यात जन्माला आल्या असल्याने राजकारणाच्या न्याय,नितिचे बाळकडू त्यांना लाहनपणीच मिळाले. ज्या वयात मुली चुलबोळक्याच्या खेळात तल्लीन असतात त्या वयात जिजाऊन तलवारची मूठ मजबूतपणे पकडत युध्दाचे धडे घेतले. मुलगी म्हणून त्यांनी केवळ स्त्रीसुलभ कल्पनेला कवटाळत न बसता युध्दकौशल्यात प्राविण्य मिळविले. अल्पवयातच त्यांचा शहाजीराजे भोसलेसोबत   विवाह झाला.      
                      जिजाबाई चतूर,मुद्सुद्दी,बुध्दीमान,करारी व्यक्तीमत्वाच्या स्त्री होत्या. आलेल्या बिकट परिस्थितीला तोंड देण्याच धैर्य त्याच्यांत होत. जिजाबाईच्या पठडीत केवळ शिवबाच घडले नाही तर त्यांच्या सोबत मावळेही तेवढयाच ताकतीने स्वराज्यासाठी लढायला तयार झाले. त्या केवळ शिवबांच्याच माता न होता आवघ्या महाराष्ट्राच्या माता झाल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत व माणसाच्या मनात,आचरणात स्वाभिमानाचे बीज पेरल. शिवबांच्या मनात केवळ कतृत्वाची ठीणगीच न पेटवता राजनिती, सामाजिक मुल्यही शिकविले. त्यांनी बालपणीच शिवरायांना स्वराज्याच स्वप्न दाखविल. जिजाऊ त्यांना शिवबा न म्हणता बाळराजे म्हणत असत याचाच आर्थ त्यांना राजा होऊन स्वराज्य स्थापन करायची, पिडीत जनतेची सुटका करुन स्वराज्याची धुरा सांभळायची जाणीवच त्यांनी या शब्दातुन करुन दिली होती. जिजाऊनी आपल्याच शाळेत शिवबांना राज्याची कर्तव्य,नितीमुल्ये,स्वतंत्र्य,समता,बंधूता याचे धडे दिले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसेच शिवबांना स्वराज्य स्थापन्याची प्रेरणा देणा-या,त्यांच्या मनात अन्ययाविरुध्द लढण्याची अंगार पेटविणा-या राजमाता जिजाऊंनी मानवी मुल्याचे विचारही पेरले.
              शुरवीर जिजाऊ बाहेरुन जेवढया कणखर होत्या तेवढयाच आतुन नारळासारख्या मऊ,प्रेमळ होत्या. ज्यावेळी शत्रुंचे सरदार भर रस्त्यावर आया बहिनींची आब्रु वेशीवर टांगत होते, जनावराप्रमाणे मुलींचा लीलाव होत होता,स्वतंत्र्य विसरुन समाज निमुटपणे अन्याय सहन करत होता. शेतक-यांनी मोत्यासारख पीक घेऊन,रक्कताच पाणी करुन पीकविलेल धान्य बादशहाच्या कणगीत जमा होत होत. कष्टाने घाम गाळून पिकवलेल्या सोन्यासारख्या पीकाचा एक घासही शेतक-यानां सुखाने खायला मिळत नव्हता. हा अन्याय,अत्याचार पाहून जिजाऊच अंतकरण तुटत होत. त्या डबडबल्या उोळयानी हिंदवी स्वराज्य स्थापन करणा-या पराक्रमी पुत्राची वाट पाहत होत्या. यासाठी त्यांना तेजस्वी,पराक्रमी,लढाऊ,सामर्थ्यावान अन्यायाला छेदुन पारतंत्र्यात अडकलेल्या समाजाला मोकळा श्वास घेण्यासाठी,  शत्रुविरुध्द लढणारा, रयतेला गुलामगिरीतुन मुक्त करणारा  पुत्र हवा होता. स्वराज्य संकल्पनेचे डोहाळे जिजाऊना लागले होते.  
               अन्याय,अत्याचाराला कुठे तरी आळा बसावा,महिलांना निर्भयपणे वावरता यावे यासाठी वीरमाता जिजाऊ आपल्या मनाशी दृढ निश्चय करुन हिदंवी स्वराज्याची स्थापना करणारा वीरपुत्र जन्माला यावा म्हणून त्यांच्या कुलदैवताकडे साकडे घालत हेात्या.देशात माजलेला हलकल्लोळ थांबविण्यासाठी,जनतेवर होणार अन्याय थांबविण्यासाठी, रयतेच्या रक्षण करण्यासाठी,हिंदवी स्वराज्याची स्थापना करणयासाठी माझ्या पोटी शुरवीर पुत्र जन्माला यावा म्हणून करुणा भाकत होत्या. आपला पदर त्या भवानी मातेसमोर पसरुन ज्या माय माऊल्यांची इज्जत लुटल्या जात होती. त्यांचे रक्षण करणारा लढावू पूत्र  या पदराखाली माझ्या माय माऊल्यांना सुखाने जगता येईल असा पुत्र दे म्हणून ध्यास घेतला होता. इ.स. 1630 मध्ये पुणे जिल्हयातील जुन्नर शहराजवळ घनदाट वनराईच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी किल्यावर शिवबांचा जन्म झाला. जिजाऊंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते. हा सहावा पूत्र तुळजा भवानीचा प्रसन्नतेचा प्रसाद होता. एकटे शिवाजी जगले  जिजाऊचीं ही करुणामय प्रार्थानां सफल झाली होती. तळपत्या सुर्याचे तेज घेऊन जन्माला आलेल्या बाळराजानां मॉ जिजाऊने महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून स्वराज्य स्थापनेचे तोरण बांधायची संकल्पना त्यांच्या तनामनात रुजवली होती.या पुत्राला राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार करायला सुरुवात केली. चौदा वर्षाचे शिवबा असतांना जिजाऊ पुण्याला रहायला गेल्या. त्याकाळी पुण्याची अवस्था खुप दयनिय होती. जिजाऊच्या देखरेखीखाली पुण्याचा पुर्नविकास झाला.
            जिजाऊच्या पठडीत शिवबा तयार होत होते. त्यांना केवळ राजनिती,समान न्याय देण्याची वृत्तीच न शिकवता अन्याय करणाराला कठोर शासन देण्याचे धाडसही शिकविले. निर्भयपणे युध्दाचा सामना करण्याचे धडे दिले,शस्त्राच्या प्रशिक्षणावर स्वत: लक्ष दिले. स्वराज्याची स्थापना केवळ एकटे शिवबा करु शकणार नव्हते शिवबांना संघटन कौशल्यही शिकविले. राज्य चालविण्यासाठी केवळ शक्तीच पुरेशी नसून युक्तीही महत्वाची होती. म्हणूनच शाहिस्तेखानाला युक्तीने पराजित करण्याचे कौशल्य जिजाबाईनीं दिले होते.  जिजाऊ नुसते प्रशिक्षण देऊनच थांबल्या नाही तर शिवबा मोठया मोहिमेवर असतांना त्या स्वत: राज्य कारभारावर बारीक लक्ष ठेवायच्या. राज्यांचा सर्व स्वा-यांचा तपशील त्या ठेवत असत. त्यांच्या खलबतात, सल्लामसलतीत भाग घेत असत. राजाच्या गैरहजेरीत स्वत: राज्यांची धुरा जिजाऊ सांभळत हेात्या.
            स्वराज्य स्थापन्यसाठी जे बीज राजमाता जिजाऊने शिवबांच्या मनात पेरल होत. त्याला केवळ अंकुरच न निघता तो आता महान वटवृक्ष झाला होता. शिवाजी राज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली पाहून राज्यभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1674 साली त्यांनी स्वतंत्र्य हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. शिवरांच्या मनात हिंदवी स्वराज्याची ठिणगी टाकून ती संकल्पना सत्यात उतरविण्यसाठी राजमाता जिजाऊने अपार कष्ट घेऊन,स्वत: हातात शस्त्र घेऊन त्या हिंदवी स्वराज्यसाठी तर लढल्याच पण आपल्या तालमीत सर्वांगीन विकासासाठी  रयतेला गुलामगिरतुन मुक्त करण्यासाठी राष्ट्राला शूरविर पुत्र अर्पण केला. आपणही अन्याय अत्याचाराविरुध्द आपल्या पुत्राला लढण्याची शिकवण आजच्या मातांनी देण्याचा संकल्प केला तर काही अंशी तरी राजमाता जिजाऊच्या तत्वावर आपण वागत असल्याचा आनंद आपल्याला मिळेल अन् ख-या अर्थाने राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊचीं जयती साजरी होईल, अशी अपेक्षा.  
                                                                                                                            बेबीसरोज अंबिलवादे,
                                                                                                                                    बीड
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा