मंगळवार, १ जानेवारी, २०१९


जिल्हा माहिती कार्यालयात
माहिता अधिकारीपदी किरण वाघ रुजू
      बीड,दि,1:- जिल्हा माहिती कार्यालयात रिक्त पदावर माहिती अधिकारीपदी किरण रामकृष्ण वाघ हे दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी रुजु झाले असून  त्यांनी सहाय्यक संचालक म्हणून मुंबई,औरंगाबाद येथे तर माहिती अधिकारीपदी परभणी येथे उतकृष्टपणे  कामाची जबाबदारी पार पाडली आहे.
        माहिती अधिकारी किरण वाघ यांचा जनसंपर्क दांडगा असून कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतात. त्यांचा स्वभाव मनमिळावू असून कामाची हातोटी  चांगली आहे. कर्मचा-यांशी चांगला संवाद साधून त्यांच्याकडूनही चांगल्या प्रकारे काम करुन घेत असल्याने आतापर्यंच्या सेवेत त्यांनी विविध ठिकाणी सक्षमपणे जबाबादारीने  कामे पार पाडली आहेत. अधिकारी,कर्मचारी व पत्रकार यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबध आहेत. *******
वृत्त्‍ क्रमांक:-2
एचआयव्ही/एड्स जनजागृती
अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज
                                                ---निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

               बीड,दि,1:- एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून जास्तीत जास्त घटकापर्यंत नाविण्यापूर्ण उपक्रमाच्या माध्यामातून पोहचण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा एड्सप्रतिबंध नियत्रंण समितीने आयोजित केलेल्या बैठकीत केले.
          या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी  डॉ. अनुराधा यादव,डॉ.एन.बी.पटेल,डॉ.एस.बी.इनामदार,डॉ. पी.के.पिंगळे,आर.डी.कुलकर्णी,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.एच.शेख उपस्थित होते.
                   यावेळी बोलतांना श्री सुर्यवंशी म्हणाले की, अतिजोखमिच्या गटामध्ये रचनात्मक पध्दतीचा अवलंब करुन शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये एचआयव्ही जनजागृती तपासणीवर अधिक भर द्यावा. जिल्हयातील संबधित एआरटी सेंटर व अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधीनीं लक्ष केंद्रीत करावे. एचआयव्ही बाधित व्यक्तीसाठी लाभाच्या विविध सामाजिक योजनाबाबतचा आढावा,आवश्यक ती उपाययोजना राबवाव्यात. एचआरटी औषधोपचार रुग्णांनी वेळेवर घ्यावेत असेही यावेळी सांगितले.
          जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी जिल्हात राबविण्यात आलेल्या एचआयव्ही एड्स कार्यक्रमाची माहिती सादर केली. या बैठकीस संबधित विभागाचे संबधितअधिकारी कर्मचारी  उपस्थित होते. ******


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा