शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी
दि. 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
            बीड,दि,3:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत 50 टक्कयापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनां मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे तसेच भोजन,निवास व इत्तर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात  यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी वरील दिनाकांपूर्वी सहाय्यक आयुक्त,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,नगर रोड बीड येथे अर्ज सादर करण्याच्या सूचना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहे.  ******

शिष्यवृत्तीसाठी मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांनी
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
            बीड,दि,3:- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क (फ्रीशीप) योजनासह इतर सर्वच शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन (मॅन्यूअली स्वरुपात) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017-18 शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी मॅट्रीकोत्तर  मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी तसेच  अनु.जाती फक्त प्रथम वर्ष,विजाभज,इत्तर मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्याची संबधित महाविद्यालयाकडून किंवा Mahaeschol.maharashtra.gov  या ऑफलाईन प्रणालीवरुन ऑफलाईन अर्जाचा नमुना प्राप्त करुन अर्जासोबत वरील शासन निर्णय दिनांक 29-1-201 प्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडून संबधित महाविद्यालयास सादर करावेत. संबधित महाविद्यालयांनी बी स्टेटमेंटसहित सर्व अर्ज दि. 15 फेब्रुवारी 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बीड कार्यालयात सादर करावेत.
            अनु.जाती प्रवर्गातील व्दितीय,तृतीय,चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्जाचे Mahaeschol.maharashtra.gov या प्रणालीवरुन महाविद्यालयांनी दि. 2 फेब्रुवारी 2018 ते 7 फेब्रुवारी 2018 या कालावधीत नुतणीकरण करुन घ्यावे. नुतणीकरणाचा दि. 7 फेब्रुवारी 2018 ही अंतिम मुदत असून यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. नुतणीकरणापासून प्रवेशित पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच सर्व महाविद्यालयाला सूचित करण्यात येते की, या कार्यप्रणाली बाबत दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,बीड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी या कार्यशाळेस शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचारी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. ******

ग्रामपंचायत निवणुकीच्या संबधितांनी
संगणीकृत नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना
बीड,दि,3:- माहे मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांसाठी संबंधितांचे नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्विकारण्याचे जाहिर केले होते परंतू मा. राज्य निवडणूक आयोगाचे 2 फेब्रुवारी 2018 च्या सुधारित आदेशानुसार पारंपारिक पध्दती ऐवजी संगणकीकृत ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार असल्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा नोडल अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहे.*******




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा