शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

संत संस्कृतीचा पाया रचणारे                           
     संत नरहरी सोनार
मानवी जीवनाला सुवर्णाप्रमाणे आध्यात्मीक व मोहक मुलामा देणारे अनेक संत जगाच्या पाठीवर होऊन गेलेत. या संतानमुळे माणसाला जीवन जगण्याची आध्यात्मिक कास मिळाली. संत नसते तर काय झाले असते असा विचार कधी कुणी केला तर संत नसते तर जशी लाईट गेल्यानंतर सगळीकडे अंधार पसरतो तसेच आपले जीवन अंधारमय झाले असते. संत म्हणजे माणसाच्या जीवनाचा व संस्कृतीचा पाया आहे.  पाया नसेल तर भिंत कोसळुन पडेल तसेच संताचे अस्तित्व नसेल तर माणसाचे जीवनही आधुरे आहे. संत हे संस्कृतीचा पाया आहे. संत जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाच्या जीवनाचा रथ वेगवान घोडयाप्रमाणे धावत राहील. संत का? असावेत तर ते नैराश्यातुन अशावादाचा मार्ग दाखवितात. वारकरी साप्रादायाची पंरपरा आपल्याला फार पूर्वीपासून लाभली आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभुती जगाच्या कल्यणासाठी विविध जातीधर्मामध्ये संतानी जन्म घेतला आहे. यात महिला संतही काही कमी नव्हत्या संत कान्होपात्रा,संत जनाबाई संत मुक्ताबाई,संत मिराबाई, संत चोखा महार,संत सावता माळी,संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत नरहरी सोनार अशी विविध संत होऊन गेली आहे. वारकरी साप्रादायामध्ये विविध जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन वारकरी साप्रादाय वाढविण्याचा प्रयत्न  आठरा प्रगट जाती जमातीच्या लोकांनी केला असून यात पंढरपुरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला त्यांच्याबद्लचा हा लेख प्रपंच.
.                                                                                                   लेखिका
                                                                                     बेबीसरोज ग.अंबिलवादे(लोळगे),बीड
                                                                                              भ्र.9921136185


            संत हे गुरुच्या ठिकाणी असतात. देवानांही गुरु करावे लागलेत. श्रीकृष्णाने संदीपानी ऋषीला गुरु केले. रामाने वसिष्ठानां गुरु केले. श्री चक्रधर स्वामीनी श्री गोविंदप्रभुनां गुरु केले आणि दत्तात्रय महाराजांनी तर एक नव्हे दोन नव्हे तर चोवीस गुरु केले.कारण संत आणि गुरु हे संसाराच्या सिडीवरुन न डगमता कसे पाय उतार व्हायचे याचे तत्वज्ञान शिकवतात. म्हणून शिवाजी महाराजानीही राज्याची घडी नीट बसाविण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन लाभावे म्हणून तुकाराम महाराजांना गुरु मानले होते. संताचे शब्द ही आमृतवाणी आणि मराठी शारदेचा अंभच ठरावा इतकी ताकद त्यांच्या शब्दामध्ये  आहे.
               संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा सुंदर दागिने घडविण्याचा होता. त्यांची कलाकुसर महाराष्ट्रभर प्रसिध्द होती. त्यांच्यातील कलाकुसर, मितभाषी, लाघवी बोलण्याची लकब, प्रेमळ स्वाभाव, धार्मिक वृत्तीमुळे लोक त्यांचे नाव ऐकुनच त्यांच्याकडे दागिने घडविण्यासाठी येत असत. संत नरहरी सोनाराची वाणी जीवन जगतांना विवेकाची वाट दाखवित असे. वारकरी पथांची भागवत धर्माची पताका संत नरहरी सोनारानी महाराष्ट्रभर फडकवली आहे. खरे तर नरहरी शिवभक्त होते पण त्यांच्या भक्तीने मनातील व्दैतभावनं त्यांना विठ्ठल भक्त बनविले आहे. त्यांची ही थोडक्यात आख्यायिका.
               अच्युपंत आणि सावित्री यांची पोटी शिवाच्या प्रसादाने अमुल्य असे रत्न प्राप्त झाले त्यांचे नाव त्यांनी नरहार असे ठेवले. आठव्या वर्षी नरहरची मुंज झाली आणि त्यांना चांगले संस्कार लागावे म्हणुन गुरुकुळात पाठविण्यात आले. नरहरवर आध्यात्मिक संस्कार झाल्यमुळे त्यांना शिवाच्या भक्तीतच आनंद वाटु लागला. गुरुकुळातील संस्कार पूर्ण झाल्यानंतर ते आईवडिलाकडे गृहस्थ आश्रमी आले. घरात त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली पण नरहरवर आश्रमांत संन्यासव्रताचे संस्कार झाल्यामुळे संसार हा त्यांना नाशिवंत व मिथ्य वाटु लागला पण केवळ गुरु आज्ञेमुळे व आई वडीलाच्या आग्रहाखातर त्यांनी गंगा नावाच्या मुलीशी विवाह केला. गंगाही धार्मिक वृत्तीची व पती आज्ञा पाळणारी असल्यामुळे नरहरीच्या जीवनात संसाराबरोबरच आध्यात्माचे पालन चालु होते.कारण पत्नी धार्मिक,सोज्वळ,पती आज्ञा पाळणारी असेल तर संसरातही स्वर्ग नांदतो हे गंगाने दाखवुन दिले आहे. नरहर केवळ जगाच्या देखव्यासाठी संसार करत होते. खरे तर त्यांचा पींड हा सन्याशी वृतीने राहून जगाच्या कल्याणाचा होता. नरहरी मात्र संसारात न रमता शिवनामातच आनंद मानत होते. 
      देवाचा  मी सोनार,नाव माझे नरहर,दागिने सोन्याचे घडवितो, हिरे कोदंणात मढवितो, अशी कलाकुसर सुंदर नाव माझे नरहर//1// भाव शिवचरणी ठेवतो, बेलपत्री नित्य वाहतो, मुखाने म्हणतो हरहर नाव माझे नरहर//2// सोने हरीनामाचे चोरतो, नाते शिवाशी जोडतो, व्यवहार कौशल्या चतूर नाव माझे नरहर //3//प्रपंच नेटका मी करतो लाघवी वाणी मी बोलतो, लक्ष असते पिंडीवर नाव माझे नरहर  //4//अज्ञानाचा अंधकार मिटवितो वाट मोक्षाची मिळवितो,जन्म घेऊन धरतीवर नाव माझे नरहर//5//जन्म सावित्रीच्या पोटी घेतो,व्यापार शिवनामाचा करतो,जामुवतांने घेतला आवतार नाव माझे नरहर //6/ पंढरपूर पावण भूमीत अनुराधा  या नक्षत्रात, झाला नरहरी आवतार देवाचा मी सोनार  नाव माझे नरहर  //7// याप्रमाणे नरहरी संसारात राहूनही शिवनामाचे सोने हरिनामाच्या कात्रीने चोरुन संसारसागराच्या भवचक्राचे छेदन करीत जीवनाचे हित कशात आहे. हा संसार म्हणजे दुखाचा भवसागर आहे हे ज्ञान त्यांना असल्यामुळे ते या भवचक्राची एक एक सिडी प्रभुनामाच्या गजराने पार करत होते. आध्यात्माचे ज्ञान झाल्याने नाशिवंत गोष्टीत त्यांना कधीच रममान व्हावे वाटले नाही. त्यांच्या मनातील व्दैत आव्दैताचा भाव नष्ट करण्यासाठी एक चमत्कार घडला.
              असेच सकाळी आपला पुजापाठ आटोपुन ते दुकानात इश्वर चितंन करत बसले असता. एक सावकार दुकानात आले आणि म्हणाले नरहरी सोनाराचे दुकान हेच आहेना? हो मीच नरहरी सोनार. अंत्यत विनम्रपणे ते म्हणाले कोणता अलंकार घडवायचा आहे आपल्याला. तेव्हा सावकार म्हणाले मी जवळच्या गावात राहणारा सावकार, तुम्ही खूप चांगले सुवर्ण अलंकार घडवतात असे मी ऐकले आहे. मला विठ्ठलासाठी  एक सोन्याचा करदोडा करायचा आहे. नरहरी  म्हणाले तुम्हाला पाहीजे तसा करदोडा मी बनवून देईन, तुम्ही माप व्यवस्थित आणून द्या.सावकाराने रेशमाच्या दो-याने माप आणून दिले आणि म्हणाले मला आगदी या मापाच्या तंतोतंत करदोडा बणून हवा आहे. नरहरी म्हणाले या मापाच्या तंतोतंत सुवर्णाचा करदोडा बनून देतो. दोन तीन दिवसानी सावकार करदोडा घेण्यास आले. सावकारांनी करदोडा हातात घेतला अन् त्यांना संत श्री नरहरीच्या कलाकौशल्याचा खरच हेवा वाटु लागला. ते म्हणाले खरंच तुम्ही खूपच सुंदर सुवर्ण करदोडा बनविला आहे. नावप्रमाणेच तुमचे कामही कौतुकास्पद आहे हे आज मला कळले. हा हिरे,रत्न,पाचु जडीत करदोडा घेऊन मोठया आनंदाने सावकार विठ्ठलाच्या मंदिरात गेले. पुजाअर्चा करुन करदोडा कमरेला बांधू लागले पण तंतोतंत केलेला करदोडा चार बोटे मोठा झाला. सावकार नरहरीच्या दुकानात आले आणि म्हणाले करदोडा चार बोटे मोठा झाला आहे. नरहरी म्हणाले मी तर आगदी तंतोतंत केला आहे. सावकार म्हणाले बहुतेक माझ्याच हातून माप जास्त झाले असावे. नरहरीने तो चार बोटे कमी करुन दिला. पुन्हा सावकार मंदिरात गेले करदोडा बांधू लागले तर तो चार बोटे कमी पडला सावकारालाही आश्चर्य वाटले.
               सावकार नरहरीला म्हणाले नरहरी तुम्ही स्वत:च मंदिरात चला आणि विठ्ठलाच्या कमरेचे माप घ्या. नरहरी मोठया अडचणीत आले. पण धीर करुन म्हणाले माफ करा सावकार मी शिव मंदिराशिवाय कोणत्याच मंदिरात जात नाही. सावकार जिद्दीलाच पेटले ते म्हणाले नाही तुम्ही स्वत: मंदिरात माप घ्यायला आल्याशिवाय मी परत जाणार नाही. नरहरी म्हणाले मी माझ्या डोळयावर पट्टी बांधुन येईल, विठ्ठलाची मुर्ती पाहणार नाही. मग त्यांनी डोळयावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मुर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तेव्हा त्यांना हाताला महादेवाची पींड लागली. त्यांनी डोळे उघडून पाहीले तर विठ्ठलाची मुर्ती समोर उभी. त्यांनी पुन्हा डोळयावर पट्टी बांधली तर पुन्हा तोच चमत्कार, महादेवाची पींड हाताला लागली. आता त्यांच्या सर्वागांला दरदरुन  घाम सुटला होता.अंगावर काटा उभा राहीला होता. थरथरत्या हाताने ते पुन्हा पुन्हा मुर्ती चाचपडू लागले. देहभान विसरुन मुर्तीकडे पाहतच राहिले. विठ्ठलाच्या मुर्तीमध्येच त्यांना त्यांचे आरध्य दैवत शिवाची र्पिड दिसत होती. त्यांनी सद्गतीत अंतकरणाने मनोभावे प्रार्थाना केली आणि पश्चताप दग्ध होऊन म्हणाले मी शिव आणि विठ्ठल वेगळे मानले पण हे दोघेही एकच आहेत.अशा या हरीहराच्या साक्षत्काराने शिवभक्त हे विठ्ठल भक्त झाले. पुढे ते संसारात जास्त रमले नाहीत. त्यांना त्यांना नाशिवंत भवसागर पार करुन मोक्षाचा पैलतीर गाठायचा होता. प्रपंच्याचा मोह त्यागुन ते हरनामात व्यापुन गेले होते. आपल्या अमोघ वाणीतुन ते समाजाला आध्यात्माचे प्रबोधन करत असतांनांच आता शेवटची जीवनमुक्तीची घटिका येऊन थांबली होती त्यांना माहित होते काळ हा कुणासाठी थांबत नाही शेवटी हरनामाची अक्षरे ओठात आणि परमेश्वराची मुर्ती डोळयात साठवत त्यांनी शककर्ता शालिवाहन बाराशे पस्तीस जाटा प्रमादी नामे संवत्सर पूर्ण/ माघ प्रतिपदेला वैकुंठ गमण केले. अशा या संतानी समाजासाठी आपला देह झिजविला. संत संस्कृतीचा पाया रचनारे संत नरहरी सोनार त्यांना कोटी कोटी प्रणाम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा