शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

जिल्हयातील जलसंधारणाची कामे
यंत्रणांनी वेळेत पुर्ण करावीत
                                                                                                -- मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले
बीड, दि. 19:- जलयुक्त शिवार योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांचे यंत्रणेला दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी या कामास आवश्यक त्या सर्व बाबींची मान्यता घेवुन ती कामे वेळेत पुर्ण करावीत. या कामामध्ये कोणतीही चुक होणार नाही. याची संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशा सुचना मृद व जलसंधारण व रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण व रोहयो सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजना आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
            या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मृद व जलसंधारण आयुक्त श्री. सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, महसुल उपायुक्त श्री कुंभार, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी पोपटराव शिंदे, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            मृद व जलसंधारण व रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी मागील वर्षातील व चालु आर्थिक वर्षातील जलयुक्त शिवार योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजनांच्या करण्यात आलेल्या कामांची व त्यावर झालेला खर्च आणि प्रलंबित असलेल्या कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडून जाणून घेतली. यावेळी बोलतांना श्री डवले म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना सर्वासाठी लाभदायी असून या योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित असलेली व चालु वर्षातील नव्याने हाती घेण्यात आलेली कामे शासन निकशानुसार कामांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीची पुर्तता करुन ती कामे केली पाहिजे. तसेच जलसंधारणाच्या दुरुस्तीच्या कामास मान्यता देण्यापुर्वी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्या कामाची प्रत्यक्ष भेट देवून पहाणी करुनच त्या कामांना परवानगी दयावी. मागेल त्याला शेततळे याचा लाभ जास्तीत जास्त शेतऱ्यांना झाला पाहिजे यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी  याकामी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
         गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना बीड जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यासाठी  संबंधित यंत्रणांनी कामाचे योग्य नियोजन करावे. चालु वर्षात हाती घेण्यात आलेल्या जिल्हयातील 518 धरणातील गाळ  काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेवून काम केले पाहिजे. या कामामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.असे सांगून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ जिल्हयातील जनतेला झाला पाहिजे. यासाठी यंत्रणेनी कामाचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नरेगाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली सिंचन विहीरीची कामे पुर्ण करण्याबरोबरच  ज्या  8 हजार 186 सिंचन विहीरीची कामे प्रगती पथावर आहेत ती  तात्काळ पुर्ण करावीत. तसेच ज्या सिंचन विहीरीच्या कामाचे मस्टर निघाले आहेत अशी कामे तात्काळ पुर्ण करावीत ज्या कामाचे मस्टर निघाले नाहित अशी सिंचन विहीरीची कामे थांबवावे  अशा सुचनाही सचिव श्री डवले यांनी यावेळी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            यावेळी जिल्हाधिकारी  एम. डी. सिंह यांनी जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनांची सविस्तर माहिती सचिव महोदयांना संगणकीय सादरीकरणाद्वारे करुन दिली. तसेच चालु वर्षात यंत्रणांना दिलेले विविध कामाचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करण्यासाठी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी आढावा बैठका घेण्यात येत असून या बैठकाच्या माध्यमातून कामाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आढावा बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश निऱ्हाळी, प्रियंका पवार, कार्यकारी अभियंता व्हि. बी. गालफाडे, गट विकास अधिकारी, कृषीचे अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.  -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा