शनिवार, २० मे, २०१७

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली



बीड, दि. 20 :- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनि‍मित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. यावेळी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, गणेश निऱ्हाळी, अपर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा