शनिवार, २० मे, २०१७

पंचायत समिती बीड येथे निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना




बीड, दि. 20 :-  बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीनूसार शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण कृषि निविष्ठा (बियाणे/खते/किटकनाशके) योग्य दर्जाची, रास्त भावात व वेळेवर मिळण्यासाठी तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, बीड येथे निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा कक्ष दि.15 मे ते 15 ऑगस्ट 2017 पर्यंत कार्यरत राहील. कक्षातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणासंबंधी तक्रारींची नोंद घेवून तात्काळ निवारण करतील. असे बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा