सोमवार, २९ मे, २०१७

तंबाखु नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


          बीड, दि. 29 :- दिनांक 31 मे हा जागतिक तंबाखु नकार दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्या अनुषंगाने चालु वर्षी बीड शहरात 31 मे ते 7 जुन या कालावधीत तंबाखु नकार दिवस व सप्ताह जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणार आहे. यासाठी तंबाखु नियंत्रणासंबंधी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या उपक्रमामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची होळी, तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत व्यंगचित्राचे प्रदर्शन विविध स्पर्धा उदा.रांगोळी, भिंतीचित्र व निबंध स्पर्धांचे आयोजन इत्यादी जिल्ह्यातील गृह-आरोग्य-शिक्षण-कृषी इत्यादी विभागासमवेत तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन, कॅन्सर वॉरीयर संघटनेच्या सहकार्याने तंबाखु नियंत्रण कायद्याची अंमलबजावणीसाठी पोलीस विभागासमवेत बैठक, दंत शल्य चिकित्सक, नाक, कान व घसा तज्ञ यांच्या सहकार्याने मौखीक कर्करोगासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन, तंबाखुमुळे होणाऱ्या कर्करोगावर समुपदेशन व प्रबोधनात्मक व्याख्यान, जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत कार्यशाळेचे आयोजन व त्याचे समुपदेशन करुन संबंधीत आरोग्य संस्था तंबाखुमुक्त करण्याबाबत प्रवृत्त  करण्यासंबंधी मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. तरी उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने व सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन सहकार्य करावे व जिल्ह्यातील जनतेने तंबाखुच्या सवयीपासून दुर रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी केले आहे.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा