बीड, दि. 4:- आंतरराष्ट्रीय
महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची
माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी बैठकीत उपजिल्हाधिकारी राजेंद्र
वाघ यांनी दिली.
महिलांप्रती जिव्हाळा व आदर व्यक्त करुन त्यांचा सन्मान करण्यात
यावा. समाज प्रबोधन घडविण्याच्या दृष्टीने 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन
म्हणून साजरा करण्यात यावा. या दिवशी बीडसह सर्व तालुक्याच्या ठिकाणी यंत्रणांनी कार्यक्रमांचे
आयोजन करावे. या कार्यक्रमांचे आयोजन करावे. या कार्यक्रमांमध्ये महिलांविषयी प्रबोधन
करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर, कर्करोग निदान शिबीर, महिला मेळावा, महिलांच्या
विकासाच्या योजनांची माहिती देणे इत्यादी उपक्रम राबविण्यात यावे अशी सुचना उपजिल्हाधिकारी
वाघ यांनी यावेळी दिली. बैठकीस महिला व बालकल्याण, शिक्षण,आरोग्य, पोलीस, महसुल इत्यादी
विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा