बीड, दि. 3 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक
(पुर्व) परिक्षा 2016 ही दि. 12 मार्च 2017 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 11 उपकेंद्रामधून
घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी एकूण 3 हजार 768 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या
कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस
बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये
मनाई आदेश जारी केला आहे.
परीक्षेसाठी
बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल,पेजर,कॅल्क्युलेटर व आभ्यासाचे इतर साहित्य
परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही तसेच आयोगाच्या सुचनेनुसार उमेदवारांना परीक्षेचे
आवश्यक साहित्यच जवळ बाळगण्याची मुभा दिली
आहे. उमेदवारांनी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक
आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे)
यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजेपूर्वी
उपस्थित रहावे परीक्षा सुरु झाल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश
दिला जाणार नाही याची संर्वानी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा