बीड, दि. 7 :- राज्यातील सर्व पंचायत समितीच्या सभापतीचे
पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (विमुक्त जाती
व भटक्या जमातीसह) शासनाचे अधिसुचना असाधारण राजपत्र पान क्र.1 ते 9 वर प्रसिध्द केली
असून त्यानूसार बीड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण शनिवार दि.7 जानेवारी
2017 रोजी जाहीर करण्यात आले आहे.
पाटोदा पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी
आरक्षित राहिल. अंबाजोगाई पंचायत समिती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित राहिल.
बीड व वडवणी पंचायत समिती नागरिकाचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित राहिल. शिरुर,
केज, माजलगाव पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर परळी आष्टी, गेवराई, धारुर पंचायत
समिती सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी,
बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा