शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन



                  
          बीड, दि. 6 :-  बीड येथील जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  जिल्हा माहिती अधिकारी  अनिल आलुरकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार महेश वाघमारे, मंगेश निटूरकर, राजेंद्र होळकर, अभिमन्यू घरत, वैभव स्वामी, विलास डोळसे, लक्ष्मीकांत रुईकर, नागनाथ जाधव, सुभाष चौरे, नाना नागरे, रविंद्र देशमुख, प्रशांत सुलाखे, श्री.अष्टपुत्रे, संतोष केजकर, आनंद गावरस्कर, कृष्णा शिंदे, संतोष राजपुत, अविनाश कुलकर्णी यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील ना.गो. पुठ्ठेवाड, मिलिंद तुपसमिंद्रे, शिवाजी गमे, भगवान ढाकरे, छगन कांडेकर, श्रीमती लता कारंडे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा