बीड, दि. 6 :- रब्बी हंगाम 2016-2017 अंतर्गत पिक विमा उतरविण्याची
मुदत ज्या पिकांकरीता 31 डिसेंबर 2016 अशी होती फक्त त्याच पिकांकरीता अंतिम मुदत वाढवुन
दि.10 जानेवारी 2017 पर्यंत करण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
याचा लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी यांनी केले आहे.
नैसर्गीक
आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या
नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कृषि
क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे अशी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्टे
आहेत. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी
2017 अशी आहे. पिकनिहाय संरक्षित रक्कम व त्याचा प्रति हे. विमा रक्कम याबाबत सविस्तर
माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
अंतिम मुदतीची वाट न पाहता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पिक विमा उतरविला नाही अशा सर्व
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे बीडचे जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा