बीड, दि. 2 :- अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) श्रेणी "क",
अभियांत्रिकी सेवा (विद्युत) आणि संगणक पदाच्या भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित
केलेल्या लेखी परीक्षा बीड येथील 7 केंद्रांवर
सुरळीतपणे पार पडल्या असून या परीक्षेसाठी 83 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान बीड शहरात झालेल्या पावसामुळे परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थींची
गैरसोय होऊ नये म्हणुन सकाळच्या अभियांत्रिक सेवा (स्थापत्य) व विद्युत या परीक्षेसाठी
अर्धा तास उशीराने येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आणि दुपारच्या सत्रात
अभियांत्रिकी सेवा (संगणक) या पदाच्या परीक्षेस 2 वाजेऐवजी एक तास उशीराने म्हणजे
3 वाजता सुरुवात करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार परीक्षा केंद्रावर घडला नसून पावसामुळे
परीक्षार्थींची कोणतीही गैरसोय झालेली नाही. या परीक्षा सुरळीत पार पडल्याबद्दल परीक्षार्थी
विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. नेहमी स्पर्धा परीक्षांना सरासरी 70 टक्के
उपस्थिती असते मात्र पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्येही 83 टक्के विद्यार्थ्यांनी
परीक्षा दिली हे विशेष आहे.
अनेक वर्षांपासून नगर परिषदातील ही पदे रिक्त असून त्याचे रितसर
रोस्टर व इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पाठपुराव्याने
ही परीक्षा घेण्यात आली. यामुळे नगर परिषदांच्या कामाला बळकटी येणार असून नागरी भागाच्या
विकासाला गती येणार आहे. या परीक्षा अत्यंत कडक बंदोबस्तात व व्हिडीओ चित्रीकरणासह
पार पडल्या. या परीक्षांचा निकाल रविवारी सायंकाळीच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात
येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा