गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर


            बीड, दि 15:- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.16 सप्टेबर 2016 ते दि.5 जानेवारी 2017 पर्यंत राबविण्याचे जाहीर केले असून छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हा ईआरएमएस अंतर्गत प्रत्येक उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यास्तरावर राबविण्यात येणार आहे.

            कार्यक्रमानूसार प्रारुप मतदार याद्या शुक्रवार दि.16 सप्टेंबर 2016 रोजी प्रसिध्द करण्यात येतील. दावे व हरकती शुक्रवार दि.16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 कालावधीत स्विकारण्यात येतील. मतदार यादीमधील संबंधित भागाचे, सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्युए सोबत बैठक इत्यादी नावांची खातरमजा शुक्रवार दि.16 सप्टेंबर ते शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल. विशेष मोहिम रविवार दि.18 सप्टेबर व रविवार दि.9 ऑक्टोबर 2016 रोजी होईल. दावे व हरकती बुधवार दि.16 नोव्हेंबर 2016 पर्यंत निकालात  काढण्यात येतील. डाटाबेसचे अद्यावतीकरण गुरुवार दि.15 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात येईल आणि अंतिम मतदार यादी गुरुवार दि.5 जानेवारी 2017 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. कार्यक्रमानूसार पात्र नागरिकांनी पदनिर्देशित ठिकाणी किंवा तहसील कार्यालयामध्ये दावे व हरकती दाखल कराव्यात. असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा