बीड, दि. 15 :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त
शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2016 रोजी
बीड येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 9 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल
विकास मंत्री तथा बीड
जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती. पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन समारंभ
होणार आहे. तसेच ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभापूर्वी बीड शहरातील स्मृतिस्तंभ,
प्रियदर्शनी
उद्यान येथे सकाळी 8.15 वाजता हुतात्मांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार
आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा