केंद्र
सरकारचे क्षेत्रीय
प्रचार संचालनालय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्यावतीने
रायमोह येथे 28 आणि 29 सप्टेंबरला
माता-बाल आणि
किशोरवयीन मुलांचे
आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम
बीड, दि.26:- केंद्र सरकारच्या माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार संचालनालय तसेच
महाराष्ट्र शासनाच्या वतीने बीड जिल्ह्यातल्या शिरुर कासार तालुक्यातील रायमोह येथे प्रजनन, माता, नवजात
शिशू, बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी
विशेष जन-जागृती अभियानाचे
आयोजन येत्या दिनांक 28 व 29 सप्टेंबरला करण्यात आले आहे.
सामान्य जनतेला
आई-बाळाच्या आरोग्याची तसेच सरकार राबवित असलेल्य़ा विविध आरोग्य योजनांची माहिती मिळावी यासाठी
दिनांक 28 सप्टेंबर 2016 रोजी रायमोह येथे महिला-बालकांसाठी रांगोळी स्पर्धा, सकस
आहार स्पर्धा आणि सुद्दृढ बालक स्पर्धा घेण्यात येणार आहेत, आणि सांयकाळी
किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यविषयी तंज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील तसेत
गावातील जनतेला आरोग्याची माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी विविध जनजागृतीचे लघु चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.
दिनांक 29 सप्टेंबर 2016 ला सकाळी
9 वाजता रायमोह गावात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पदधिकारी, अधिकारी
तसेच ग्रामस्थ, शाळा महविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर या
मुख्य कार्यक्रमास आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे, बीड
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडीत,
जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बजरंग सोनवणे, शिरुर कासार पंचायत समितीच्या सभापती
मंदाताई केदार, उपसभापती जालिंदर सानप, जिल्हा परिषद सदस्य सौ. संगीता मदन जाधव,
सरपंच मेहरुन्नीसा शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा
शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
उदयसिंह साळुंके, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तांदळे, रायमोह
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक हुबेकर, एकात्मिक बाल विकास
प्रकल्प अधिकारी एस.के. बांगर, प्रा. नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात
आई-बाळाचे आरोग्य, मुलांचे आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्वच्छ
भारत अभियान या विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमा
दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या पारितोषिके देऊन सत्कार करण्यात
येणार आहे.अशी माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर
येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी
दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा