बीड - मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे नियम 142(1) अन्वये बीड जिल्हयात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बीड जिल्हयातील (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, टीडी-1, एफएल-बीआर-2) इत्यादी अबकारी अनुज्ञप्ती दि.6 जुलै 2016 रोजी रमजान ईद सणानिमित्त संपुर्णत: बंद ठेवावी असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द नियमानूसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा