बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

 

ई - पीक पाहणी साठी जिल्हयात

विशेष मोहिम -- जिल्हाधिकारी

          बीड, दि. 22 (जि.मा.का.) 15 ऑगस्ट पासून राज्यात ई- पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात पीक पेरणीची माहिती स्वत: शेतक-यांनी मोबाईल ॲपव्दारे गाव नमूना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या क्रातिकारी कार्यक्रमाची राज्यात अमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी,पूर,कारोना महामारी आणि उशीराच्या मान्सुनमुळे ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उशीराने झलेला शुभारंभ याचा विचार करुन खरीप   हंगामाची पीक पाहणी नोदंविण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

         बीड जिल्हयात मागील एक महिन्यात 2,28,463 शेतक-यांनी ॲप डाऊनलोड करुन 2,18,504  शेतक-यंनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित शेतक-यांनी त्यांचा पीक पेरा ई पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने 23 सप्टेबंर ते 26 सप्टेबंर 2021 पर्यंत विशेष मोहिम बीड जिल्हयात राबवून शेतक-यांनी पीक पेरा पूर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

        त्याची सर्व जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संबधित उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यात 23 सप्टेबंर 2021 ते 26 सप्टेबंर 2021 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यासाठी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करुन ही माकहिम यशस्वी करावयाची आहे. सदर मोहिम यशस्वी करण्याकरिता अधिनस्त तहसीलदार कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व इत्तर आवश्यक कर्मचा-यांची मदत घ्यावी. बीड जिल्ह्यात एकूण 1 हजार 402 महसूली गावे प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी करुन पीक पाहणी पुर्ण करावयाची आहे. 23 सप्टेबर 2021 ते 26 सप्टेबंर 2021 रोजी  ई- पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे करण्यासाठी पुढीलप्रमाणे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

           तालुक्याचे, नाव गावाची संख्या बीड- 239,आष्टी- 177, पाटोदा- 107, वडवणी 49, शिरुर कासार- 95, गेवराई- 192, अंबाजोगाई- 106, केज- 135, माजलगाव- 121, धारुर- 73, परळी- 108 एकूण 1402. प्रत्यक गावासाठी 10 किंवा उदिष्टानुसार कमी/अधिक प्रमाणात स्वयंमसेवकांची निश्चत करावयची संख्या. आणि प्रत्येक स्वंयसेवकास 20 शेतक-यांची नोंदणी केल्यास पूर्ण होणारे काम(कमी अधिक प्रमाणात) बीड- 2390, 47800 आष्टी- 1770,35400, पाटोद- 1070,21400, वडवणी- 490, 9800, शिरुर कासार- 950,19000, गेवराई- 1920,38400, अंबाजोगाई- 1060, 21200,केज- 1350,27000, माजलगांव- 1210,24200, धारुर- 730,14600, परळी- 1080,21600, एकूण 14020, 280400 वरील उदिष्टे साध्य होण्याच्या दृष्टीकोनातून व मोहिम यशस्वीकरण्यासाठी प्रत्येक गाव निहाय नियोजन व जनजागृती  करावयाची आहे.

        या मोहिमेसाठी मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगारसेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएसी केंद्र चालक संग्राम केंद्र चालक, मोबाईल ज्ञान असलेला तरुण वर्ग, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वंयसेवकांची Volunteers ची निवड करुन त्यांचे सहाय्याने गावातील शेतक-यांना ई- पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे व पीक पेरा भरुन घेण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.

         प्रत्येक गावासाठी दहा किंवा गरजेनुसार कमी- अधिक स्वंयसेवकांची  (Volunteers)  निवड करण्यात यावी व त्यांना दि. 2 सप्टेबंर 2021 रोजी आपल्या तालुक्यातील मास्टर ट्रेनर्स मार्फत ई- पीक पाहणी ॲपचे प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेच्या दिवशी 23 सप्टेबंर 2021 ते 26 सप्टेबंर 2021 रोजी प्रत्येक दोन तासाने आढावा घ्यावा व जिल्ह्यात तीन लक्ष शेतक-यांचे पीक पेरा नोंदणी पूर्ण करण्याचे उदिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात यावा. असं जिल्हाधिकारी राधाबिनोद शमा यांली सूचित केले आहे.

*-*-*-*-*-*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा