मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८


शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थ्यापर्यंत
पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
                                  --मुख्य न्यायाधिश श्रीमती प्राची कुलकर्णी
बीड, दि. 2:- शासनाच्या विविध योजनांचा वंचित व गरजु घटकांना लाभ मिळावा या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, अशा सूचना मुख्य न्यायाधिश श्रीमती प्राची  कुलकर्णी यांनी  बीड जिल्हयातील साक्षाळपिंप्री येथील आरोग्य केंद्रात  जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07 आक्टोबर 2018 रविवार रोजी आयोजित महाशिबीराच्या पुर्वतयारी  आढावा बैठकीत  श्रीमती प्राची कुलकर्णी बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी, न्यायाधिश श्री. गांधी, न्यायाधिश श्री वाघ, दिवाणी न्यायाधिश श्री सुरवसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,सरपंच श्री. घाडगे, श्री काशिदे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सर्व विभाग प्रमुखाचां महाशिबिरासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन सर्व संबधित विभागाने शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी जासतीत जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या तसेच महाशिबीरासाठी येणा-या नागरिकानां व लाभार्थ्यांनां ऑनलाईन  योजनेची  जास्तीत जास्त  प्रमाणात माहिती व्हावी या दृष्टीने  ऑनलाईन पध्दतीने संगणकाव्दारे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध ठेवावी व संबधित विभागाने महाशिबिराच्या ए‍क दिवस आधी येऊन आप आपले गाळे ताब्यात घेऊन योजनांची माहिती लाभार्थ्यांना स्पष्ट दिसावी, वाचता यावी  अशा दर्शनी भागात पोस्टर,बॅनर लावावेत, असे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
            साक्षाळपिंप्री येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात विविध योजनांच्या प्रचार प्रसारासाठी एकूण 72 गाळे संबधित विभागाला उपलब्ध्‍ करुन देण्यात येणार असून या परिसराच्या महाशिबीर आढावा बैठकीच्या अध्यक्षा, मुख्य न्यायाधिश सौ. प्राची कुलकणी, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक व इत्तर संबधित अधिका-यांनी प्रत्येक्ष पाहणी करुन गाळाधारकांना गाळे उभारणी संदर्भात व संबधित विभागास स्वच्छतेसंबधी सूचना दिल्या.
            यावेळी महात्मा गांधी  जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ******




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा