बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 14 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शुक्रवार दि.16 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 10.05 वाजता औरंगाबाद येथून शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव.

          शनिवार दि.17 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.15 वाजता स्मृतिस्तंभ, प्रियदर्शनी उद्यान, नगर रोड येथे हुतात्मा स्मारक श्रध्दांजली अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती (स्थळ-पोलीस परेड ग्राऊंड). सकाळी 9.15 वाजता जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीची पाहणी व जिल्हा वकील संघास भेट. सकाळी 9.30 वाजता दै.सुर्योदय कार्यालयास भेट (स्थळ- हॉटेल अन्विताच्या बाजूस, जालना रोड, बीड). सकाळी 9.45 वाजता बीड येथून तेलगाव (बु) ता.धारुर जि.बीडकडे प्रयाण. सकाळी 10.40 वाजता आगमन व लोकनेते सुंदररावजी सोळंके यांचा पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास उपस्थिती (लोकनेते स्व.सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि.सुंदरनगर पो.तेलगाव ता.धारुर, जि.बीड). दुपारी 12.30 वाजता तेलगाव येथून माजलगावकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता माजलगाव येथे आगमन व माजलगाव धरणातील पाण्याच जलपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-माजलगाव धरण साईड). दुपारी 2 वाजता शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा