शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

स्वच्छ भारत मिशनबाबत बीड बसस्थानकावर जनजागृती



            बीड, दि. 19:-  जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व राज्य परिवहन महामंडळ बीड आगार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणानिमित्त भावाने बहिणीला शौचालय भेट देण्यासंबंधी व एसटीनेच प्रवास करावा असा संदेश देणारे पत्रक बसस्थानकावर व प्रत्येक बसमध्ये वाहकामार्फत लावून नवीन संकल्पना सुरु केली.

            बीड बसस्थानकावर दि.18 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे व राज्य परिवहन बीड विभागाचे विभाग नियंत्रक श्री.पन्हाळकर यांच्या हस्ते पत्रकाचे अनावरण करण्यात आले. या पत्रकाचे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वासनिक, गटविकास अधिकारी श्री.तुरुकमारे, विभागीय वाहतूक अधिकारी श्री.वावरे, लेखाधिकारी श्री.मुंडे, श्री.गरकल, आगार व्यवस्थापक श्री.जानराव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा