शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


            बीड, दि. 19 :-  जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक व जिल्हा परिषद व पंचायत समिती रिक्त पदाच्या पोट निवडणूकीची मतदान प्रक्रिया व मतमोजणी संबंधाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन बीड जिल्ह्यातील अनुज्ञप्ती दि. 23 ऑगस्ट 2016 या मतदानाच्या पूर्वीचा दिवस, दि. 24 ऑगस्ट मतदानाचा दिवस व दि. 25 ऑगस्ट 2016 या  मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

            जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या आष्टी तालुक्यातील मौजे कासारी, हनुमंतगाव, लिंबोडी, शेरी बु, मोराळा,देसूर तर शिरुर तालुक्यातील मौजे कान्होबाची वाडी, भडकेल व अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा, सातेफळ, सौंदाना, सेलुअंबा आणि केज तालुक्यातील मौजे घाटेवाडी, दिपेवडगाव, तर गेवराई तालुक्यातील मुधापूरी, किनगाव. धारुर तालुक्यातील मौजे चिंचपूर, व्हरकटवाडी. बीड तालुक्यातील पालसिंगण, मांडवजाळी, रुद्रापूर, चौसाळा, पिंपरगव्हाण, खापरपांगरी. माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर, भाटवडगाव, तेलगाव खु, देवखेडा, रामपिंपळगाव, पुनंदगाव, पिंपळगाव ना, परळी तालुक्यातील मौजे तांडा (प), डाबी, भोपळा या सर्व ठिकाणच्या देशी दारु, विदेशी दारु (एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-1, सीएल-2, सीएल-3, बियर शॉपी, ताडी इत्यादी ) सर्व अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात म्हटले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा