बीड,
दि. 1 :- मौजे पालवन ता.बीड जि.बीड येथील अहमदनगर-बीड-परळी
वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाकरीता संपादित जमिनीबाबत मौजे पालवण गट नंबर 131/132,
132/133, 133/134, 134/135, 136/137, 137/138, 138/139 या सर्व गट नंबरमध्ये भूसंपादन
संयुक्त मोजणी अहवालावर आक्षेप अर्ज दिलेले आहेत. ज्या धारकांनी उपविभागीय अधिकारी
भूसंपादन बीड यांच्याकडे आक्षेप अर्ज नोंदी दिलेल्या आहेत. अशा सर्व जमीन धारकांना
कळविण्यात येते की, बुधवार दि.3 ऑगस्ट 2016 आणि गुरुवार दि.4 ऑगस्ट 2016 रोजी उप अधिक्षक
भुमि अभिलेख कार्यालयामार्फत चौकशीचे काम होणार आहे. आपण आपल्या मालकी हक्काच्या पुराव्यासह
आपल्या जमिनीमध्ये हजर रहावे नसता आपले काहीही म्हणने नाही असे समजुन आलेल्या आक्षेपाची
दखल घेतली जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे प्रभारी उपअधिक्षक भुमि अभिलेख,बीड यांनी
कळविले आहे. अधिक माहितीसाठी पी.ई.चव्हाण भ्रमणध्वनी क्रमांक 7588567959 वर संपर्क
साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा