बीड, दि.
26 :- जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने मंगळवार दि.30 ऑगस्ट
ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महाअवयवदान अभियान हाती घेतले आहे. यानिमित्त जिल्ह्यात
बीड शहर व तालुकास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार
दि.30 ऑगस्ट 2016 रोजी बीड शहरात व तालुकास्तरावर वॉकॅथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले
आहे. बुधवार दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी महाविद्यालयामध्ये निबंध व रांगोळी स्पर्धा घेण्यात
येणार आहेत. तर गुरुवार दि.1 सप्टेंबर 2016 रोजी ज्या दात्यांनी अवयव दान व किडणी दान
केले आहे अशा अवयवदान दात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी किडणीदान करणाऱ्या व्यक्तींनी
जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा तसेच ज्या व्यक्तींना आपल्या मृत्युनंतर अवयवदान
करावयाचे आहे त्यांनी जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांशी संपर्क साधून आवश्यक
तो फॉर्म भरुन द्यावा. अवयवदानाचा अर्ज www.dmer.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.अशोक बोल्डे यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा